Popular Posts

Thursday, July 24, 2014

एकदाच तू डॉक्टर हो

" एकदाच तू डॉक्टर हो "

हे सुजाणं मानवा 

एकदाच तू डॉक्टर हो 

एकदाच तू वैद्य हो 

कुष्ठरोगाचे नाव अंगावर काटा आणते 

टीबी ने थरकाप होतो 

कर्करोगाची बाधा एका आईच्या स्तनास होते 

एडस ला सतत कुरवाळावे लागते 

रुग्ण तपासत असताना तोंडावर खोकतो 

गळू फोडत असताना पु डोळ्यावर उडतो 

सुई काच रोज एकदातरी लागते 

रक्तबंबाळ अवयवांवर प्रेम करावे लागते   

एनिमा देताना विष्ठा अंगावर उडते 

विखुरलेले अवयव गोळा करावे लागतात 

मेलेल्या अर्भकाची प्रसूती करावी लागते 

सडलेल्या अवयवातील अळ्या ग्लोवजवर बागडतात 

हे भल्या माणसा ,

एकदाच  तू डॉक्टर हो 

एकदाच तू वैद्य हो 

रोज नवे प्रश्न आणि अवघड उत्तरे 

जमले तर बरे अन्यथा अब्रूची लक्तरे 

नाकात वसणाऱ्या गंधाला काय करतील अत्तरे 

पैसे मागावेत की लगेच ठरती दैत्य सारे 

सत्य कसे सांगावे अन खोटे कसे बोलावे 

जिभ लाळघोटी होते,  पण नेत्र आता ना ओलावे 

घाण साफ केलेल्या हातानी जेवून बघ 

भयाण दृश्ये आठवत जर झोपून बघ 

हे सुजाण मानवा 

एकदाच तू डॉक्टर हो 

एकदाच तू वैद्य हो 

चुकला की मेला, रुग्णही आणि स्वतःही 

कारण देवाचा अवतार तू 

चुकण्याचा अधिकार गमावलास तू 

साधतोस तू स्वार्थ आणि परमार्थही 

ना तू कृष्णही, ना होतो तुझा पार्थही 

तू स्तंभ आहेस माणुसकीचा 

तू स्तंभ आहेस सभ्यतेचा 

तू स्तंभ आहेस सहृदयतेचा 

तू स्तंभ आहेस समाजाचा 

तुला ना हक्क भेळ,पाणी पुरी  खाण्याचा 

तुला ना हक्क आनंदात रस्त्यावर फिरण्याचा 

तुला ना हक्क सिनेमागृहात शिट्टी मारण्याचा

तुला ना हक्क सौन्दर्यवतिकडे बघण्याचा 

हे रंगेल माणसा 

एकदाच तू डॉक्टर हो 

एकदाच तू वैद्य हो 

 

No comments:

Post a Comment